विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्ग मोकळा

0
44
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमदार विजय रहागंडाले व जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या पुढाकाराने पदोन्नतीचा प्रश्न निकाली

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मानले आभार

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्यासाठी दिनांक 2 जानेवारीला निवेदन देऊन 15 जानेवारी पर्यंत मागण्या / समस्या सोडविण्यात आल्या नाही,तर आंदोलनाचा इशारा दिला होता.याकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास चर्चेकरीता पाचरण केले आणि सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांना दिले.तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनीही सातत्याने या प्रश्नावर शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी सोबत चर्चा केली होती.बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले आहेत. यामध्ये सेवा जेष्ठता यादीचा प्रवास अंतिम टप्प्यात असल्याने विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहेत. २२१ चटोपाध्याय वेतन श्रेणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागात सादर करण्यात आले.तर  उर्वरित सर्व चटोपाध्याय प्रस्ताव तीस दिवसांमध्ये निघाली काढण्यात येणार आहेत. निवड श्रेणीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याने तेही लवकरच मंजुरीस्तव पाठवण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना आठ दिवसात शासन निर्णयापर्यंत प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांचे विद्युत देयके भरण्यासाठी ग्रामपंचायतींना आदेशित करण्यात येणार व वीज वितरण कंपनीला व्यापारी मीटर वरून घरगुती मीटर करण्यासंदर्भात लेखी पत्र देण्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, गट नेता लायकराम भेंडारकर, शिक्षण समिती सदस्य शैलेश नंदेश्वर यांनी पुढाकार घेवून प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या मंजूर करण्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला सहकार्य केल्याबद्दल किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया यांनी आभार मानले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांच्या नेतृत्वात विभागीय अध्यक्ष केदार गोटेफोडे,राज्य उपाध्यक्ष आयुब खान,उमाशंकर पारधी,जिल्हा सरचिटणीस अरविंद उके,हेमंत पटले,गजानन रामटेके,प्रभाकर मेश्राम,सुरेश वाघाडे,कैलास हांडगे,मोरेश्वर बडवाईक,कृष्णा गभने,होमेंद्र चांदेवार, रत्नशिल गजभिये, रोशन गराडे, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.