मुंबई, दि. 10 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा उमेदवार नोंदणी प्रणालीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन झाले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी. डांगे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे आयुक्त महेंद्र वारभुवन, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या प्रणाली अंतर्गत करण्यात येणाऱ्या नोंदणीचा वापर उमेदवार पुढे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठीही नोंदणी करताना करू शकतील.
नव्या स्वरूपातील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळामध्ये उमेदवारांसाठी मदत केंद्राव्यतिरिक्त टोकन स्वरूपात तक्रार नोंदविण्यासाठी प्रणाली तसेच प्रगती या चॅटबॉटची मार्गदर्शनासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.