एस.एस.जायस्वाल महाविद्यालयात विद्युत सुरक्षा जन जागृती कार्यक्रम

0
7

अर्जुनी मोर.शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय येथे विद्युत सुरक्षा सप्ताह च्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. भारत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मंचावर भौतिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. एल. चौधरी, IQAC समन्वयक डॉ के. जे. सीबी, महावितरण अर्जुनी मोरगाव (उप विभाग) चे उपकार्यकारी अभियंता अमित शहारे तसेच प्रमुख अतिथी प्रदीप राऊत सहा. अभियंता केशोरी, उपस्थित होते.
विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजन करण्यामागिल भूमिका डॉ चौधरी यांनी प्रास्ताविकातून विशद केली.
या प्रसंगी बोलताना अमित शहारे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा प्रमाणेच आजच्या काळात वीज सुद्धा महत्त्वाची गरज झालेली आहे. मात्र एखाद्या व्यक्तीला विजेचा झटका लागल्यास त्याच्या शरीरातील विवध अवयवाला इजा होत असते, वीज शॉक कसा लागतो, त्या संदर्भात खबरदारी काय घ्यावेत, सेफ्टी डिव्हाइसेस म्हणजे काय, या विषयी त्यांनी माहिती दिली. इन्सुलेशन निघाला असल्यास योग्य रित्या टेपिंग करणे, इलेक्ट्रिक पोल किंवा स्टे वायरला प्राणी व जनावरे बांधण्याचे टाळणे, इलेक्ट्रिक वायर खाली तणीसाचे ढीग किंवा त्यासारखे ज्वलनशील साहित्य व ट्रॅक्टर/गाड्या इतर वाहने ठेवायचे टाळणे इ. खबरदारी घेतल्यास जीव हानी तसेच मालमत्ता हानी टाळता येवू शकते. कुलरला तसेच घरातील इलेक्ट्रिक सर्किटला प्रॉपर अर्थिंग वापरल्यास अपघात टाळता येऊ शकतात. मोबाईल चार्ज होत असताना मोबाईल चा वापर करू नये, तसे केल्यास बेटरी गरम होऊन अपघात होऊ शकतो. असे मार्गदर्शन अमित शहारे यांनी केले. सर सलामत तो पगडी पचास या म्हणीनुसार विजे च्या उपकरणांचा वापर काळजी पूर्वक करण्याचा मोलाचा संदेश डॉ सीबी यांनी केले.
डॉ भारत राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना विजेचे उपकरण वापरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आणि आपल्या घरी तसेच परिसरात विजेचे उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी बाबत जनजागृती करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन कु. माधवी ब्राह्मणकर आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. किरण देशमुख ने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी पोस्टर आणि निबंध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक तसेच अतिथिनी पोस्टर्सचे अवलोकन केले. गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय येणारे स्पर्धकांना 26 जानेवारीला संस्था अध्यक्ष मा. लूनकरणजी चितलांगे यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात येईल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पंकज उके, प्रा. सुमेध मेश्राम, प्रा. अजय राऊत, डॉ. शरद मेश्राम, प्रा. शेखर राखडे, वैभव कापगते, लोकेश कापगते, कु. मंजिरी वैद्य, कु. अंकिता खोटेले इत्यादींनी सहकार्य केले.