मानवधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म- माजी मंत्री राजकुमार बडोले

0
15

अर्जुनी मोर. –आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवन जगत असताना, सर्वांशी, प्रेमाने, आपुलकीने,व सन्मानपूर्वक निर्व्यसनी आचरण करणे हे समाजविकासासाठी आवश्यक आहे त्यासाठी महानत्यागी संत जुमदेवजी बाबा यांचे मानवधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातील मौजा मोहगाव/तिल्ली येथे दि.१७ जानेवारीला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तर्फे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले. असता उपस्थित सेवक मंडळीशी संवाद साधत संबोधित करतांना ते पुढे म्हणाले की, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव समाजाला व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी जागृत करून, अनेक व्यसनाधीनतेने ग्रासलेल्या कुटुंबाला नवसंजीवनी देण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या कार्याची शासन स्तरावर दखल घेऊन, त्यांचा कार्याचा गौरव म्हणून जुमदेवजी बाबा यांचा जन्मदिवस व्यसनमुक्ती दिन म्हणून जाहीर करण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याचे सांगीतले. तसेच बाबा जुमदेवजी चे हे कार्य परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने अतिशय निरपेक्ष हेतूने केले जात आहे त्यामळे ह्या मंडळाचे कार्य प्रशंसनीय असल्याचे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी परमात्मा एक सेवक मंडळ अध्यक्ष श्री.राजुजी मदनकर,उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख,संचालक श्री.टिकारामजी भेंडारकर,कोषाध्यक्ष प्रवीणजी उराडे, सहसचिव मोरेश्वरजी गभणे,मार्गदर्शक श्री.शालिंदरजी कापगते समस्त मार्गदर्शक,सेवक मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.