गोरेगाव,दि.27- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव ( बु.) येथे ७५ वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी गांवचे सरपंच,उपसरपंच व तं.मुक्त समिती अध्यक्ष तसेच शाळेचे सेवानीवृत मुख्याध्यापक बी.डब्लू कटरे गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी * शाळेचे माजी विद्यार्थी व भारतीय सैन्य दलातील सैनिक विजय उपवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तदनंतर विविध कार्यक्रम व आंतरशालेय स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.बक्षीस वितरण कार्यक्रमा प्रसंगी डॉ निखिल नागपुरे,आकाश बावनथडे,आशिष कटरे सर्व माजी विद्यार्थी यांनी विधार्थ्याना मार्गदर्शन केले.व प्रमाणपत्र तसेच मेडल्स प्रदान करुन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ,तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन व्हि.एस.मेश्राम ,आभार प्रदर्शन टि.एफ.इळपाचे यांनी केले.वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.