गोंदिया,दि.27- अदानी फाउंडेशन तिरोडा शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे व त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारावा यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करत असते यावर्षी सुद्धा पारंपारिक पिकाला बगल देत 100 शेतकऱ्यांना मका लागवडीसाठी सहाय्य करून त्यापासून मूरघास निर्मिती कशी करावी याचे प्रशिक्षण दिले.
त्यामुळे तालुक्यातील 100 शेतकऱ्यांनी 100 एकर शेतीमध्ये मका लागवड केली आहे व आता मका कापणीला आला असून त्यापासून जनावरांसाठी पौष्टिक असलेले मुरघास निर्मिती करण्यात येणार आहे.
सरासरी 1 एकर शेतीमध्ये 20 टन मुरघास तयार होईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.सोबतच तयार केलेला मुरघास विक्रीची सुद्धा सोय अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा करून देण्यात आली आहे.
पीक पद्धतीत बदल केल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढण्यास मदत होईल व त्यासोबतच मका लागवडीसाठी उत्पादन खर्च कमी होत असल्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी मका लागवडीकडे वळतील असे मत अदानी फाउंडेशन प्रमुख बिमुल पटेल यांनी व्यक्त केले तर अदानी फाउंडेशन चे कार्यक्रमाधिकारी कैलास रेवतकर यांनी मका या पिकापासून बनविलेला मुरघास हा जनावरांसाठी पौष्टिक असल्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन वाढीसाठी सुद्धा मदत करेल असे सांगितले.
तिरोडा तालुक्यातील 100 शेतकरी मुरघास निर्मितीतून घेणार लाख रुपयांचे उत्पादन- अदानी फाउंडेशनचा पुढाकार
वाढदिवसाच्या शुभेच्छा