अर्जुनी मोरगांव,दि.28- तालुक्यातील जि.प.व.प्राथमिक शाळा खांबी येथे ७४व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने सरपंचा निरूपाताई बोरकर यांच्या ध्वजारोहण हस्ते करण्यात आले.यावेळी शाळा शिक्षण समितीच्या अध्यक्षा प्रियंकाताई खोटेले, पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम,तसेच सर्व ग्रां.पं.सदस्ये शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि गावातील नागरीक उपस्थित होते.गावातील नवयुवक,प्रतिष्ठित नागरीकांनी महापुरुषांचे फोटो शाळेला विशेष भेट म्हणून दिले.सांयकाळी शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समिती सदस्य संदिप कापगते यांनी पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षणाची गोडी लावावी तसेच त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर होते.प्रत्येक विद्यार्थ्यात सुप्त गुण दडलेले असतात.अंगात असलेल्या सुप्त गुणांची ओळख झाली पाहिजे, त्या दिशेने वाटचाल केल्यास सर्वांगीण प्रगती होते गुणांची ओळख पटविण्यासाठी शालेय जीवनात व्यासपीठ म्हणून स्नेहसंमेलने,सांस्कृतिक ही माध्यमे असतात असे विचार व्यक्त केले.स्थानिक निधीतून शाळेतील जूनी जिर्ण झालेल्या ईमारतीचे दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याची सांगितले.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्यानुसार शिक्षकांची पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन नारायणजी भेंडारकर यांनी केले.पाहुणे म्हणून शुभम बहेकार,रूतन लोणारे ग्रां.पं सदस्य,प्रकाश शिवणकर,प्रमोद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.