जिल्हा विज्ञान प्रदर्शनीत माध्यमिक विभागात हरिहरभाई पटेल विद्यालय चिरचाळबांध जिल्ह्यात प्रथम

0
10

गोंदिया,दि.31ः जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरावर पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनीत आमगाव तालुक्यातील हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांधच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील राजस्थान विद्यालय गोंदिया येथे ३०,३१ जानेवारी २०२४ ला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.यात हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांधची कु.जानवी राजकुमार चौधरी हिने शिक्षक एल.एफ.लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ” स्मार्ट ब्लाइंड स्टिक “नावाचा प्रयोग तयार केला.या प्रयोगाचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.तिच्या या यशाबद्दल आज ३१ जानेवारीला बक्षीस वितरण कार्यक्रम डायटचे प्राचार्य राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे,माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या उपस्थितीत प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तिच्या या यशाबद्दल बहुजन हिताय जगत शिक्षण संस्था गोंदियाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी जे.एस.रांहागडाले,सचिव एन.एन.येळे,संचालिका श्रीमती विमलताई राहांगडाले आणि सर्व संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य बन्सीधर शहारे तसेच हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले