९ फेब्रुवारीला उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन

0
67

गोंदिया,दि.02- जिल्हा व परिसरातील लोकांना उत्तम आरोग्याच्या सोयी सुविधा प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले.ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्याच्या घडीला जागेअभावी गोंदिया येथील मेडिकल कॉलेज के.टी.एस रुग्णालय व बाई गंगाबाई रुग्णालयात सुरु करण्यात आले.निधी व अन्य तांत्रिक बाबी अभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाला उशीर होत होता. खासदार प्रफुल पटेल यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नशील होते. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामाला केंद्र सरकार कडून निधी व अन्य सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या ९ फेब्रुवारीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे भूमिपूजन देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड़,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस,उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,खासदार प्रफुल पटेल,मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले खासदार प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील नागरिकानीं अभिनंदन केले आहे.