शिक्षण विभागातील कर्मचारी लंचब्रेकच्या नावावर मारतात बुट्टी

0
16

गोंदिया दि.०२: गोंदिया जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग नेहमी विविध कारणांनी चर्चेत असतो,गेल्या काही दिवसापासून कर्मचारी आंदोलनाची भाषा वापरून कामावर बहिष्कार घालतात.पण  लंच ब्रेकच्या नावावर हे कर्मचारी मात्र आपल्या कामाला महत्व न देता गप्पा हाकत कार्यालयाबाहेर बसत असल्याचे चित्र आज शुक्रवारला सायकांळच्या सुमारास बघावयास मिळाले.तर काहीनी तर आपला टिपीन घेऊन जाण्याची वाट ४ वाजेपासूनच बघत होते.तर काही मोबाईलवरच गप्पामध्ये व्यस्त असल्याचे बघावयास मिळाले.