राष्ट्रीय स्तरावरील गणितीय अबॅकस स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोर. – पं. बच्छराज व्यास विद्यालय मेडिकल चौक नागपूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.जीनियस चॅन्स व जीनियस अकॅडमी नागपूर यांच्यातर्फे ही स्पर्धा मेंटल कॅल्क्युलेशन, टेबल रायटिंग सारख्या सहा स्तरावरून नागपूर शाखेच्या डॉ. जयश्री राम घाटबांधे यांच्या आयोजनाखाली घेण्यात आली. सुमारे दोनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ञ आणि शैक्षणिक सल्लागार डॉक्टर नितीन विधाने, प्रा. शर्मिला कछवाह, शालिनी गुणेरकर यांची उपस्थिती होती. गोंदिया जिल्ह्यातील इटखेडा येथील जयश्री चेतन शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेच्या माध्यमातून गणितीय कौशल्य आत्मसात करण्याबरोबर अंगभूत क्षमता विकसित करण्यासाठी प्राथमिक स्तरापासून गणित विषयांमध्ये प्राविण्य मिळवितात. नागपूर येथे झालेल्या या अबॅकस गणितीय स्पर्धेत शिक्षिका जयश्री शेंडे यांनी 19 स्पर्धकांना सहभागी करून घेतले होते. आरुष चव्हाण प्रथम श्रेणी ,अथर्व गायधने द्वितीय श्रेणी, श्लोक गाडेकर द्वितीय श्रेणी, यांनी यश संपादन केले .या स्पर्धेतील इतर स्पर्धकांमध्ये अर्णव सुखदेवे, आराध्या मेंढे,रोशीका निंबार्त, हर्ष लंजे, कुशल मुनेश्वर, मंथन परिहार, नक्ष घनाळे ,कुणीका निंबार्ते, सार्थक जकुलवार, श्लोक लंजे ,स्पर्श उंदीरवाडे, श्रेयस मस्के, तृषांत जिरीतकार, यश बागडे ,येतार्थ बहेकार,यथार्थ राहिले यांना प्रमुख अतिथीच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यांचे संपूर्ण श्रेय शिक्षिका जयश्री शेंडे यांचे कडे जात असून स्पर्धकांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.