हवाई सुंदरी सुषमा कोरेटी हिचा सहपरिवार सत्कार

0
69

अर्जुनी मोर. -जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी सुषमा कोरेटी हिच्या राहते घरी जाऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
आदिवासी बहुल अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील भसबोळण या छोट्याशा गावातील सुषमा कोरेटी हिने गगनभरारी घेत एयर इंडिया मध्ये हवाई सुंदरी पदाला गवसणी घातली.तिने आपल्या क्षेत्राचा नावलौकिक केला.घरची हलाखीची परिस्थिती, वडील शेतकरी,शेतीचा व्यवसाय करुन वडीलांनी आपल्या मुलांनी शिकुन सुजाण नागरिक व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून मुलांना शिकविले आणि आज त्यांची मेहनत व मुलांची जिद्द व चिकाटीने त्यांच्या मेहनतीला फळ दिले. एका आदिवासी गावातील तरुणीने मिळवलेले यश आज गावागावात चर्चेचा विषय ठरला आहे.
यावेळी इंजि यशवंत गणविर म्हणाले,आज सुषमा च्या माध्यमातून आपल्या गावाचे तालुक्याचे व जिल्ह्याचे नावलौकिक झाले,हिने केलेली मेहनत,तिच्यात असलेली जिद्द व चिकाटी या पासुन इतरही युवक-युवतींनी प्रेरीत होऊन गगनभरारी घ्यावी व आपल्या परिवारासह आपल्या क्षेत्राचा नावलौकिक करावा.यावेळी सुषमा चे वडील शिवलाल कोरेटी,गोठणगाव चे सरपंच संजय ईश्वार, सामाजिक कार्यकर्ते कलिराम काटेंगे, पत्रकार संदिप रहिले व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.