विद्यार्थ्यांचा शारिरीक व बौध्दीक विकास व अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे:-सभापती संगिता खोब्रागडे

0
8

सडक अर्जुनी:–तालुक्यातील जि.प.केंद्र प्राथमिक शाळा कोसमतोंडी येथे १,२ व ३ फेब्रुवारीला तीन दिवसीय वार्षीक स्नेह सम्मेलन साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे तसेच विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढविणे व मुल्य शिक्षण तसेच बौध्दीक विकास व्हावा या हेतूने स्नेह सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. ‌ ‌ ‌ स्नेह सम्मेलनाचे व शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संगिताताई खोब्रागडे सभापती पं.स. सडक अर्जुनी यांचे अध्यक्षतेत व उद्घाटक निशाताई काशिवार पं.स.सदस्या,दिप प्रज्वलक डाॅ.अविनाश काशिवार सभापती कृउबा सडक अर्जुनी, रंगमंच पुजक महेंद्र पशिने सरपंच,प्रतिमाताई वाघाडे उपसरपंच,गौरेश बावनकर तालुका प्रभारी भाजयुमो,प्रमुख अतिथी मुख्याध्यापक बी.जे.नेवारे गजानन काशिवार अध्यक्ष तंमुस,राज्यपाल शेल्लारे,अश्विनीताई काशिवार,कुंदाताई मळकाम,संगिताताई काशिवार,प्राचार्य बी.बी.येळे,उमेश बोधनकर अध्यक्ष शा.व्य.समिती,प्रियंकाताई वाळवे उपाध्यक्ष शा.व्य.समिती,बी.पी.डोंगरवार,चंद्रप्रकाश काशिवार,विकास कावळे,दिवाकर काशिवार,जी.के.काशिवार,एस.आर.परतेकी,जी.एस.सिंगनजुडे,लताताई काळसर्पे पो.पा. यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी सभापती संगिताताई खोब्रागडे यांनी व्यासपीठावरुन विद्यार्थ्यांचा शारिरीक व बौध्दीक विकास होण्यास सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मदत होते.तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याचे उत्तम व्यासपीठ असल्याचे मार्गदर्शनात सांगितले.या कार्यक्रमात जी.जी.काशिवार शिक्षिका व बी.पी.डोंगरवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. ‌ ‌ तीन दिवसीय स्नेह सम्मेलनात बाल आनंद मेळावा,विविध सांस्कृतिक कार्यक्रम,महिलांसाठी हळदी कुंकू,महिलांच्या स्पर्धा,संगीत खुर्ची,भावगीत स्पर्धा,उखाने स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. ‌ ‌ तीन दिवसीय कार्यक्रमाचे बक्षीस वितरक बी.एम.ठाकरे से.नि.मुख्याध्यापक यांचे अध्यक्षतेत व शिवकुमार काशिवार यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी महेंद्र टेंभरे,पवनकुमार यावलकर,आत्माराम कापगते,मंगेश भगत,लुमेंद्र मेश्राम,अनिल काशिवार,अशोक बावनकर,रविकुमार कापगते,चंद्रभान झिंगरे,प्रशांत काशिवार,अशोक पटले यांचे उपस्थिती पार पडले.सर्व शालेय विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. ‌ ‌ कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक बी.जे.नेवारे,यु.एस.वाघमारे सहशिक्षिका,ए.एच.गुप्ता सहशिक्षक,के.एस.कुसराम सहशिक्षक, उमेश बोधनकर अध्यक्ष शा.व्य.समिती,प्रियंका वाळवे उपाध्यक्ष शा.व्य.समिती,कान्व्हेंट शिक्षिका मालती आरसोडे,अनु वैद्य,माता पालक संघ व शिक्षक पालक संघाचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन के.एस.कुसराम व आभार मुख्याध्यापक बी.जे.नेवारे यांनी मानले.