तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा १५ जून रोजी

0
6

आमगाव : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईच्या सौजन्याने लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक आमगाव येथे बुधवारी १५ जून रोजी सकाळी ९ वाजता स्थलित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २0१६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग दहावी व बारावीनंतर किंवा पदवी मिळविल्यानंतर विविध व्यावसायिक नोकरी उन्मुख संधीविषयी संभ्रम निर्माण होतो. कोणते क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे, हेदेखील विद्यार्थ्यांना माहीत नसते. आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेण्यात चूक झाली तरी संपूर्ण आयुष्य उद्वस्त होते. अशावेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यास जीवनाला योग्य दिशा मिळते व जीवन योग्य दिशेने वळन घेते.योग्य उपक्रम निवडणे सोपे व्हावे याच दृष्टीने स्थलीत तंत्रशिक्षण मार्गदर्शं मेळावा आयोजित करण्यात आले आहे. उद््घाटन खंडविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या हस्ते भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव केशवराव मानकर राहतील. अतिथी म्हणून राज्य गुप्त वार्ता अधिकारी राम वाघ, तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाचे उपसचिव आर.व्ही. येनकर, प्रा.ए.एस. बहेंडवार, लिलाधर कलंत्री, प्रा. लाबुली शॉक्स उपस्थित राहतील. मेळाव्यात दहावी, बारावी, पदवी व इतर सर्व विद्यार्थ्यांना सन २0१६-१७ प्रवेश प्रक्रियेबाबत तसेच शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती व कॅरिअरबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. यात विद्यार्थी व पालकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष सुरेश असाटी, डॉ.डी.के. संघी व प्राचार्य संदीप हनुवते यांनी केले आहे. विनायक अंजनकर, पंकज कटरे यांच्याशी संपर्क साधावा.