शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवावी

0
8

देवरी : केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या कल्याणाकरिता विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु या आदिवासीबहुल नक्षल क्षेत्रात प्रशासकीय अधिकारी जनतेपर्यंत योजना पोहोचवित नाही. त्यामुळे लोकांना कल्याणकारी योजनांची माहिती मिळत नाही. अधिकारी हे जनतेचे नोकर आहेत. सरकारी योजनांना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे काम आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.

चिचगड येथील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राजस्व विभाग देवरीद्वारे आपले सरकार महाराजस्व अभियान शिबिरात बोलत होते.

अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी होते. अतिथी म्हणून जि.प. सदस्य अल्ताफ हमीद, भाजप तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, पं.स. सदस्य गणेश टोपे, मेहतलाल कोराम, नगरसेवक यादोराव पंचमवार, श्रीकृष्ण हुकरे मंचावर उपस्थित होते.