लागवड कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-पालकमंत्री बडोले

0
20

गोंदिया दि.१४ :- आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. येत्या १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हयात होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १३ जून रोजी आयोजित सभेत जिल्हयात १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छायाताई दसरे, सडक/अर्जुनी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी, अर्जुनी/मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर, गोरेगाव पं.स. सभापती दिलीप चौधरी, सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. जुन्या योजनेतून केलेली वृक्ष लागवड व १ जुलैला करण्यात येणारी वृक्ष लागवडीतील रोपे जगविणे महत्वाचे आहे. जिल्हयातील अनेक गावांना जोडणारी रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रम हा नियोजनबध्द पध्दती राबवावा असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, १ जुलैला होणारा २ कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम जिल्हयात लोकचळवळ म्हणून राबविण्यात येणार आहे. एक घर एक वृक्ष या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, बचत गटांच्या महिला व‍ विद्यार्थ्यांना या वृक्ष लागवडीत सहभागी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध यंत्रणांच्या आतापर्यंत ६ बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वृक्ष लागवड कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळावा यासाठी आकाशवाणी, स्थानिक केबल नेटवर्कवरुन मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ज्या ठिकाणी रोपे लावण्यात येणार आहे त्या ठिकाणी रोपांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ९ लक्ष ७२ हजार ३४३ रोपे जिल्हयात या कार्यक्रमांतर्गत लावण्यात येणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व यंत्रणांना या कार्यक्रमात प्रभावीपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पंचायत समित्यांचा परिसर, अंगणवाडी पशूवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत यासह अन्य कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करणार येणार असून रोपे जगविण्याची जबाबदारीही संबंधितांवर निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपसंचालक बडगे यावेळी माहिती देतांना म्हणाले, २ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्रम सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सोबत घेऊन प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्हयात सामाजिक वनीकरण ह्न २,४८,००००, वनविभाग ह्न १७,०९,२३०, वनविकास महामंडळ ह्न ४,४०,०००, कृषी विभाग ह्न ३१,७५५ व खाजगी ह्न १,६९,७८५ या विभागांनी एकूण २५ लक्ष ९८ हजार ७७० विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली आहे.
या वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत सामाजिक वनीकरण ह्न २५,०००, वन विभाग ह्न ७,४८,०००, वन विकास महामंडळ ह्न ३१,८००, इतर विभाग व सेवाभावी संस्था ह्न १,१५,९५०, वन्य प्राणी विभाग(कोका) ह्न २६,५९३ आणि नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र ह्न २५,००० आदी यंत्रणा ९ लक्ष ७२ हजार ३४३ रोपट्यांची लागवड लोकसहभागातून करणार आहे. त्यासाठी ८ लक्ष ५६ हजार ३९३ खड्डे खोदण्यात आले आहे. इतर विभागाकडून रोपट्यांच्या लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.