जायस्वाल महाविद्यालयात सायन्स ॲक्टिव्हिटी व सेंट्रल रिसर्च इंस्ट्रूमेंटेशन सेंटरचे उद्घाटन

0
20

अर्जुनी मोरगाव,दि.20- स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात (दि.१८) नागपूूर विद्यापीठाचे कुलगूरू डॉ.सुभाष चौधरी यांच्या शुभ हस्ते सायन्स ॲक्टिव्हिटी व सेंट्रल रिसर्च इंस्ट्रूमेंटेशन सेंटरचे उद्‌‌घाटन करण्यात आले. तसेच प्राणीशास्त्र विभागाने तयार केलेल्या अक्वाकल्चर युनिटचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्‌‌घाटन प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.संजय दुधे,विद्यापीठाचे सर्व अधिकारी, अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लूनकरण चितलांगे, उपाध्यक्ष बद्रिप्रसाद जायस्वाल, सचिव मूकेश जायस्वाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर मोहूर्ले,आईक्यूएसीचे समन्वयक डॉ.के.जे.सिबी,अधिसभा सदस्य डॉ.पी.एस.डांगे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. संस्थाध्यक्ष लूनकरण चितलांगे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व स्वागत शाल , श्रीफळ व ग्रामगीता देवून करण्यात आले. भौतिकशास्त्र विभागातर्फे बीएससी प्रथम वर्षचा विद्यार्थी अनिकेत यांनी तयार केलेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे चित्र कुलगुरुना भेट देण्यात आले. परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा हे या सायन्स सेंटरचे उद्देश आहे , असे प्राचार्य डॉ ईश्वर मोहूरले यांनी विषद केले. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी या सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर मुळे नाविन्यताला चालना मिळेल अशी आशा बाळगली. सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर तयार करण्याकरिता भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ डी.एल.चौधरी, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गोपाल पालीवाल,ग्रंथपाल अजय राऊत, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नितीन विलायतकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत बोरकर, प्रा पंकज उके , डॉ आशीष कावळे , डॉ. श्यामकुंवर , प्रा. मेश्राम , प्रा. खरे मॅडम, डॉ शरद देशमुख , डॉ सतीश बोरकर , प्रा अंकित नाकाडे , प्रा मोहन धुराटकर, डॉ मनोज बांगडकर , श्री बादल लाडे ,  गजानन कोल्हे तसेच प्रीती राऊत, अनिकेत मेश्राम, श्रावणी मेश्राम या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.