34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये जिल्हा परिषद शाळा इंजोरी तालुक्यात प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये जिल्हा परिषद शाळा इंजोरी तालुक्यात प्रथम

0
96

blank

अर्जुनी मोर.-राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबवित आहे.राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अभियान सद्यस्थितीत राज्यभरात सुरू असून १५ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्हयातील सर्व शाळांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शाळा इंजोरी ही शाळा स्पर्धेत उतरली होती. या अभियानाच्या माध्यमातून शाळेने अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अशा अनेकविध घटकांचा व उद्दिष्टांवर काम करत अर्जुनी /मोर.तालुक्यातील इंजोरी या लहानशा गावातील लहानशा शाळेला लोकसहभागातून संस्कार, संस्कृती, सुंदरता व शिक्षण*या पैलुनी सजलेल्या शाळेला तजेलदार, सदाबहार करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विठोबा रोकडे व लाखेश्वर लंजे सहायक शिक्षक यांनी आपल्या कल्पकतेने सजिव संकल्पना साकारुन*अर्जुनी /मोर.तालुक्यातून *प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबाबत शाळेचे विलास निमजे साहेब खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी ऋषीदेव मांढरे साहेब, वरिष्ठ विस्तार अधिकारी अनिल चव्हाण साहेब, यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या सफलतेसाठी वेळोवेळी भरभरुन सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा गटनेते, रविंद्र खोटेले माजी सरपंच, मोरेश्वर मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, डाकराम मेंढे पोलीस पाटील,सौ.सोनीताई तवाडे उपाध्यक्ष, दिपकंर उके सदस्य, राजकुमार मेंढे,सौ.वनीताताई मेश्राम,सौ.कल्पनाताई भेंडारकर,सौ.कल्पनाताई खोटेले,सौ.दिपीकाताई रहेले,सौ. हिरकणीताई मेश्राम,सौ.किरणताई मेंढे,सौ.गायत्रीताई मेंढे,सौ.रूपालीताई मेंढे व सर्व पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

blank