अर्जुनी मोर. -गोंदिया जिल्ह्यातील बोंडगावदेवी हे माॅ.गंगाजमुनाचे मोठे तिर्थक्षेत्र आहे.या तिर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा .यासाठी आपन एक कोटी चा निधी मंजूर केला असुन या कामाचे भुमीपुजन करणे हे मी माझे सौभाग्य समजतो असे प्रतिपादन खासदार सुनिल मेंढे यांनी केले.
तालुक्यातील बोंडगावदेवी येथे एक कोटी दहा लाख रुपये तिर्थक्षेत्र निधीच्या बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी( ता.२१ ) भुमिपुजक म्हणुन खासदार सुनिल मेंढे बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर होते. अतिथी म्हणुन जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे,पं.स सदस्य संदिप कापगते, नुतनलाल सोनवाने, कुंदाबाई लोगडे, सरपंच प्रतिमा बोरकर, उपसरपंच भाग्यवान फुल्लुके, ग्रा.पं.सदस्य डाॅ. शामकांत नेवारे, अमरचंद ठवरे, भाजपा तालुका महामंत्री लैलेश शिवनकर, बाजार समिती संचालक व्यंकट खोब्रागडे, कंत्राटदार विनोद नाकाडे, उपसरपंच पराग कापगते, सरपंच विशाखा वालदे, अविनाश कापगते, खविसचे संचालक रत्नाकर बोरकर, राधेश्याम झोळे, पुरुषोत्तम डोये, पोलीस पाटील मंगला रामटेके, सदानंद भोंडे, संजय कापगते, व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोंडगावदेवी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर म्हणाले की बोंडगावदेवी हे गाव तिर्थक्षेत्र म्हणून सर्वदुर प्रख्यात आहे.या तिर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा हा आपला प्रामाणिक प्रयत्न होता.आपन स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत माता मंदिर परिसरात दहा लक्ष निधिची आवारभिंत, मंदिर परिसरात दहा लक्ष टिनाचे बांधकाम,तर मंदिर परिसरात दहा लक्ष निधीतून पेवर ब्लाॅक बसविने असे तिस लाखाचे काम आणले आहे.तर पर्यटन व तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत खा.सुनिल मेंढे यांचे विशेष प्रयत्नातुन ८० लाखाचे असे एकुन एक कोटी दहा लाख रुपये निधीच्या कामाचे भुमीपुजन बोंडगावदेवी येथे होत असल्याचे भेंडारकर यांनी सांगितले .