गोंदिया,दि.26- महाराष्ट्र शिक्षण सेवा(प्रशासन शाखा)गट अ मधील शिक्षणाधिकारी व तत्सम अधिकारी यांच्या विनंतीनुसार एैन परिक्षेच्या काळात आज 26 फेब्रुवारीला बदलीचे आदेश काढण्यात आले.त्यामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.कादर शेख यांच्या बदलीचे आदेश धडकताच खासगी शिक्षण संस्थाचालकामध्ये आनंद दिसून येत असल्याची चर्चा आहे.त्यांच्या जागी मात्र शिक्षण विभागाने गोंदियात कुठलाही अधिकारी न दिल्याने जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.विशेष म्हणजे आज काढण्यात आलेल्या बदली आदेशात विदर्भातील वर्धा व गोंदिया येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी हटवण्यात आले परंतु दोन्ही ठिकाणी जागा भरण्यात न आल्याने सरकारचे विदर्भाकडे बघण्याचा दृष्टीकोन ते सुुद्दा एैन परिक्षेच्या काळात कसा आहे हे बघायला मिळत आहे.