गोरेगाव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरी करण्यात आली. प्री प्रायमरी वर्ग, 1 ली ते 9 वि च्या विध्यार्थ्यानी अनेक प्रकारचे प्रोजेक्ट तयार करून त्यांची विज्ञान प्रदर्शनी शाळेच्या प्रांगणात लावली. उपरोक्त दिनानिमित्त शाळेचे संस्था सचिव प्रा.आर.डी.कटरे, प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले, प्राचार्या सौं सी.पी.मेश्राम, पर्यवेक्षिका कु. एस. डी. चिचामे, त्याचबरोबर विज्ञान शाखेतील शिक्षक वर्ग यांनी विध्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन केले. शालेय प्रांगणात लावलेल्या विद्यान प्रदर्शनीतून सर्व विध्यार्थ्यांनी माहिती गोळा केली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.