आमची शाळा आदर्श शाळा अभियान,जि.प.प्राथ.शाळा यशवंतग्राम चिचटोला तालुक्यात अव्वल

0
53

 सडक अर्जुनी:- अदानी फाउंडेशन यांचे संकल्पनेतून सुरू आमची शाळा आदर्श शाळा”या अभियानात सडक अर्जुनी तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा यशवंतग्राम चिचटोलाने सहभाग घेतला होता.शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमामुळे व गावक-यांच्या लोकसहभागामुळे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.शाळेने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. ‌ ‌ विद्यार्थी दशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनून जाते.शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करून शिक्षण आनंददायी,प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते. अदानी फाउंडेशन अंतर्गत आमची शाळा आदर्श शाळा अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थीदशेतच स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत होणार आहे. आमची शाळा आदर्श शाळा अंतर्गत गावातील शाळामधील शिक्षक,पालक,विद्यार्थी,माजी विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यास आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे व केंद्रस्तरावर. तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा यशवंतग्राम चिचटोला ने सहभाग घेवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. ‌. ‌ या शाळेला या स्पर्धेसह आत्तापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.जि.प.प्राथमिक शाळा यशवंतग्राम चिचटोला ने वर्ग व शाळा उतकृष्ठ सजावट,शाळा परिसराचे सौंदर्यीकरण,विद्यार्थ्यांचे अनेक उपक्रम राबवून व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग,शैक्षणिक गुणवत्ता व वैयक्तीक विकाशासाठी आवश्यक अवांतर उपक्रम,शाळेची इमारत रंगरंगोटी व परिसरातील स्वच्छता व प्रबोधनात्मक सुविचार,राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याचे उपक्रम,विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन,जन आर्थीक साक्षरता व कौशल्य विकास,शाळेत दप्तर मुक्त शनिवार,विद्यार्थ्यांच्या बौध्दीक व शारीरीक गुणांना चालना यासारखे अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गोंदिया जिल्हा शिक्षण विभागा मार्फत अदानी फाऊंडेशन यांचे उपक्रमानुसार तालुक्यातील या समितीने जि.प.प्राथमिक शाळा यशवंतग्राम चिचटोला शाळेचे मुल्याकंन करून या शाळेला तालुक्यात प्रथम आदर्श शाळा म्हणून निवड केले. शाळेच्या या यशामध्ये मुख्याध्यापक पी.बी.नांदगावे,शिक्षक एस.डी.कापगते,केंद्र प्रमुख ए.टी.लंजे,गटशिक्षणाधिकारी बागडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय कापगते व समितीचे पदाधिकारी सौ निर्मलाताई कापगते सरपंच,जनार्धन डोंगरे उपसरपंच व ग्रामपंचायत तील सर्व सदस्य गण व गावातील नागरीकांचे सहकार्य लाभले.