प्रतापगड येथे जि.प.उपाध्यक्षांच्या उपस्थितीत यात्रा नियोजन आढावा बैठक

0
45

अर्जुनी मोर,दि.29- हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगड येथे महाशिवरात्री जत्रेच्या नियोजन आढावा बैठक निवासी जिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरवर्षी १० ते १५ लाख भाविक भक्त जत्रेला येतात.त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व यात्रेकरूंना नाहक त्रास सहन करावा लागु नये या दृष्टीने आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत आरोग्य,पाणी,विज,निवास, परीवहन व्यवस्था,अग्निशमन व प्रामुख्याने पोलिस विभागाचा आढावा घेण्यात आला.पार्किंग व्यवस्था त्याचप्रमाणे यात्रा बाजारात येणाऱ्या दुकानांची मांडणी अशा विविध विषयांवर आढावा घेण्यात आला व कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडणारा नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जि.प.उपाध्यक्षांनी केले गेले.
विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतापगड गावात दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते.एकीकडे ख्वाजा उस्मान गणी हारुणी यांची दरगाह तर दुसरीकडे महादेव पहाडी स्थित पुरातन शिवमंदिर दोन्ही ठिकाणी लाखोंच्या संख्येने सहभागी होणारे भाविक यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तानाजी सावंत, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, तहसिलदार अनिरूद्ध कांबळे,तथा सर्व विभागीचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.