‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अंतर्गत सावली शाळा विभागात दुसरी

0
33

देवरी,दि.५ -“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमात देवरी तालुक्यातील सावली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळेने नागपूर विभागात दूसरा क्रमांक पटकावला आहे. शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमामुळे व गावकऱ्यांच्या लोकसहभागामुळे शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे जिल्हयात सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण राज्यात राबविण्यात आला. यामध्ये देवरी तालुक्यातील सावली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळेने प्रभावीपणे कामगिरी करीत मूल्यांकनातील प्रत्येक मुद्द्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्या शाळेत केली. शाळेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळेच संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावलीला प्रथम क्रमांक देण्यात आला . २५ फेब्रुवारी रोजी विभागीय मूल्यांकन समितीद्वारे शाळेचे मूल्यांकन करण्यात आले यात उपसंचालक उल्हास नरड,सह उपसंचालक दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी कादर शेख (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये उपस्थित होते.

गेल्या ३ मार्च २०२४ रोजी शिक्षण आयुक्त यांनी राज्यातील विजेत्या शाळांची यादी जाहीर केली. यामध्ये नागपूर विभाग स्तरावर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीने दुसरा क्रमांक पटकावला असून शाळेतील शिक्षकांसह दहा व्यक्तींचा सत्कार मुंबई येथे ५ मार्च २०२४ रोजी होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक दीपक कापसे, पदवीधर शिक्षक संदीप तिडके, विषय शिक्षिका वर्षा वालदे, तुषार कोवले, जोहनलाल मलगाम, माया उईके, विद्याताई सोनवाणे, वैशाली बिंजलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” हा उपक्रमात नागपूर विभागात दुसरा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानथम, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे,गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, प्रकल्प प्रभारी दिलीप बघेले,शिक्षण विस्ताराधिकारी एस जी वाघमारे, केंद्रप्रमुख सुरेंद्र जगने, सरपंच झुलनताई पंधरे, उपसरपंच राजेश्वरी बींजलेकर ,ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभूदयाल पवार, पोलीस पाटिल चंद्रसेन रहांगडाले,संजय बिंझलेकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,शिवेंद्रसिंह परिहार उपाध्यक्ष ,अनिल खंडाळकर, मनोहर भेलावे,अनिल भेलावे, संतोष कसमारे, ललित पवार , छनेश्वरी ताई वैद्य,हेमलताताई चकोले,इंदिरा पंधरे, अश्विनीताई मुनेश्वर ,छायाताई शहारे ,मनोरमा शेंडे यासह सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.