अर्जुनी मोर.-एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाचे वतीने तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातुन सुदृढ बालक ,माता बालसंगोपन व किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते. अंगणवाडी केंद्रातुनच नवजात बालकांना पोषण आहारासोफतच अक्षर ओळख व त्यामाध्यमातुन पुढील शाळेची ओढ लावली जाते.तर माता बालसंगोपनाच्या माध्यमातुन गरोदर माता व किशोरवयीन मुलींना पोषक आहारा सोबतच नित्यनेमाने तपासणी, वजन ,असे अनेक उपक्रम राबविले जातात.सोबतच एकात्मिक बालविकास प्रकल्पा अंतर्गत आयोजीत करण्यात येणा-या मेळाव्यातुन महिला सक्षमीकरणातुन आत्मनिर्भर महीला असे अनेक उपक्रम राबविले जातात.त्यामुळे प्रत्येक ग्रामवासियांनी आपल्या बालकांना नियमित अंगणवाडी मधे पाठवावे,कारन अंगणवाडीतुनच माता बालसंगोपन व किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते असे आवाहन गोंदिया जिल्हा परिषद चे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी केले.
तालुक्यातील इंजोरी येथे आयोजीत अंगणवाडी इमारतींचे लोकार्पण व महिला मेळावा* ता.२९ )कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन लायकराम भेंडारकर बोलत होते. एकात्मिक बालविकास सेवा योजना अर्जुनी मोर. च्या वतीने आयोजित महिला मेळावा व अंगणवाडी इमारतीचे उदघाटन महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांचे हस्ते, गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी सभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोळे, पंचायत समिती सदस्य संदिप कापगते, कुंदाबाई लोगडे, पुष्पलता दृगकर, बालविकास प्रकल्प अधिकारी कु.किरणापुरे मॅडम,पुस्तोडे मॅडम, भाकरे मॅडम, पटले मॅडम, कोठेवार मॅडम, नारायण भेंडारकर, दिपंकर उके, रविंद्र खोटेले, सरपंच कुरुंदाताई वैद्य, उपसरपंच काशिनाथ कापसे, सरपंच सरिता राजगीरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी, डाॅ. कुंदन कुलसुंगे, पोलीस पाटील डाकराम मेंढे, लैलेश शिवनकर, मुख्याध्यापक विठोबा रोकडे, सहा. शिक्षक लाखेश्वर लंजे, तथा बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणा-या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिस व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम देवी सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. महिला मेळाव्याचे औचित्य साधुन इंजोरी येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजोरी येथील प्रवेशद्वाराचे दर्शनी भागात संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण, सोबतच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना राबविल्या जात असून या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन करून विविध योजनांची माहिती दिली. या मेळाव्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला प्रोढ मुली, अंगणवाडीतील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या, यात पाककृती आहार रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची गीत गायन समूहगीत रनिंग स्पर्धा डान्स स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी विविध मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात आले संचालन सौ नमिता लाकेश्वर लंजे तर आभार पुष्तोडे मॅडम यांनी केले.