गोरेगाव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड सायन्स जुनिअर कॉलेज गोरेगाव मध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन उत्साहाचा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्रा.आर.डी.कटरे सचिव श्री तुलसी शिक्षण संस्था गोरेगाव. त्याचप्रमाणे शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले, पर्यवेक्षक कु. एस. डी. चिचामे, स.शी. कु. एन के ठाकूर, सौं. आर. बी. पटले, सौं. एस एच मिश्रा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून करण्यात आले. सर्वप्रथम महिला दिनानिमित्त औचित्य साधून शाळेतील सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ व पेन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर महिला शिक्षिकांकरिता खेळाचे आयोजन करण्यात आले. खेळात विजय झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षकांकरिता अलपोहाराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सर्व तयारी पुरुष शिक्षक वर्गाकडून करण्यात आली. संचालन स. शिक्षक टी. आर.पटले व आभार रितेश हरिनखेडे यांनी मानले.