एम.बी.पटेल महाविद्यालयात जागतिक महिला दिनी जनजागृती

0
13

देवरी,दि.१३- गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग तसेच रासेयो यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण झिंगरे हे होते. प्रमुख अतिधी म्हणून सुनीता डोये,कमला मस्के, प्रा.सुनीता रंगारी आदी उपस्थित होत्या. याप्रसंगी वुमन सेलच्या अध्यक्ष प्रो. डॉ.वर्षा गंगणे यांनी जागतिक महिला दिनी वैचारिक मंथनातून स्त्रियांच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्याची संधी उपलब्ध करून दिली. यावेळी शालू कोरे या कला शाखेतील विद्यार्थिनीने स्त्रियांच्या स्थितीबद्दल भाष्य केले.
यावेळी बोलताना सुनीता डोये यांनी महिला योजनांवर प्रकाश टाकला.  कमला मस्के यांनी सुंदर नृत्य सादर केले. रासेयो प्रमुख प्रा. रंगारी यांनी स्त्रियांची दशा आणि दिशा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. वर्षा गंगणे यांनी मांडले. प्रगती चोपकर,किरण ठाकरे, खुशबू बावणे,शालू कोरे, किरण सार्वे,प्रिया शहारे यांनी स्वागतगीत सादर केले. दरम्यान, प्रा.डॉ.वर्षा गंगणे यांचा प्रमुख अतिथींनी शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे संचालन कु.बन्सोड यांनी केले. उपस्थितांचे आभार पूर्वेश उके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण गुरुमार्गी ,मंदार देव, उर्फी शेख, विशाल लाडे,निखिल भेंडारकर, चंद्रशेखर वाघाडे, लक्ष्मी नंदेश्वर यांनी सहकार्य केले.