जानव्ही वैद्यची शिष्यवृत्ती करीता निवड

0
25

गोरेगाव,दि.१३ः पी.डी.राहांगडाले विद्यालय गोरेगाव येथील वर्ग 8वी ची विद्यार्थिनी कु.जानव्ही दुर्वराज वैद्य हिची डिसेंबर
2023मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना परिक्षेत(NMMS) शिष्यवृत्ती करिता निवड झालेली आहे.तिचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डाॅ.टी पी येळे,संस्थेचे सचिव एडॅ.टी बी कटरे,संचालक यु.टी.बिसेन, प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक ए.एच.कटरे, मार्गदर्शन शिक्षिका एस.आर.मांढरे,वर्ग शिक्षक आर.टी.पटले, एस.जी.दमाहे व सर्व शिक्षकांनी केले आहे.तिने यशाचे श्रेय आई वडिलांना व शाळेतील गुरुजनांना दिले आहे.