अवकाळी पावसामुळे मका पिकाचे मोठे नुकसान

0
9

अर्जुनी मोरगांव,दि.१३- तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तविलेल्या विदर्भातील संपूर्ण गोंदिया जिल्ह्याच्या भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.तर मागील 4 ते 5 दिवसांपासुन अर्जुनी/मोरगाव तालुक्यात वादळी वारा,विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. तालुक्यात सध्या मका पिकाची मळणी सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या मका अवकाळी पावसामुळे भिजला असुन मक्याला अंकुर फुटले आहेत. यामुळे मका पिकांचे नुकसान तर झालेच,मात्र बाजारात मिळणारा दर शुध्दा शेतकऱ्यांना मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाई करिता मागणी केली आहे.तर या अवकाळी मुसळधार पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असुन गारवा तयार झाला आहे.