तिरोडा,दि.०१ मेः-समग्र शिक्षा समावेश शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक, सामाजिक ,शैक्षणिक गरज लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सत्र 2024 – 25 मधील विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या सत्रामध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या मुलांकरीता शाळा पूर्वतयारी कार्यक्रम व इयत्ता सहावी ते बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षण घेता घेता भविष्यात स्वयंरोजगाराची संधी प्राप्त व्हावी.त्यांना समाजाचा एक उत्पादक घटक म्हणून जगता यावे, याकरीता शाळा पूर्व तयारी व किमान कौशल्य विकसन कार्यक्रम 1 मे 2024 ते 21 जून 2024 पर्यंत आयोजित आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज दिनांक 1 मे रोजी तालुका संसाधन कक्ष जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळा तिरोडा येथे करण्यात आले. किमान कौशल्य विकसन कार्यक्रम अंतर्गत 16 दिव्यांग विद्यार्थी यांना रांगोळी तयार करणे, खडू तयार करणे ,पायदान तयार करणे ,संगीत प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण याचा लाभ मिळणार आहे.आजच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.बी साकुरे,अशोक बर्येकर (शिक्षण विस्तार अधिकारी),बि.डी मिश्रा( समन्वयक गट साधनकेंद्र तिरोडा),के.एम.रहांगडाले( मुख्याध्यापक) यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे संचालन समावेशित शिक्षण तज्ञ प्रमोद खोब्रागडे यांनी केले व आभार अमोल डोंगरदिवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक बी.आर.कडव,एम.बी.मेश्राम,कु.सविता डोंगरे,के.पी.रहांगडाले यांनी सहकार्य केले.