स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने महाराष्ट्र दिनाचा निषेध

0
4

गोंदिया :- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सार्वत्रीक विदर्भातील निवडणुकीची रणधूमाळी संपल्यानंतर नव्या येणाऱ्या सरकारला चेतावनी देण्याच्या दृष्टीने व विदर्भाचे स्वत्रंत राज्य तात्काळ निर्माण करण्याचे प्रयत्न म्हणून विदर्भ राज्य निर्मिती आंदोलनाची सातत्यता कायम ठेवण्याच्या दृष्टीने १ मे महाराष्ट्र दिनी गोंदिया जिल्हा मुख्यालय शहरातील केंद्र स्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी विराआंसचे जिल्हा समन्वयक अतुल सतदेवे, विदर्भवादी वसंत गवळी, डी.एस. मेश्राम, उपाध्यक्ष भोजराज ठाकरे, सचिव रवी भांडारकर, शहर अध्यक्ष महिला आघाडी पंचशीला पानतावणे, मनोरमा बोरकर, छाया रामटेके, विजय गणवीर, राजेंद्र बनसोड, गुलाब निर्वाण आदी अन्य विदर्भवादी कार्यकर्ता शामील झाले होते. जनतेचे व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध मागण्या संदर्भात प्रेस नोट जारी करण्यात आली.