गोंदिया जिल्ह्यातून आदेश देशमुख १२ वीत प्रथम,जिल्हा नागपूर विभागात प्रथम

0
120

गोंदिया,दि.२१ः जिल्ह्यात यावर्षी १२ वी च्या परिक्षेकरीता १९१४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी १९०७९ विद्यार्थी परिक्षेला बसले.तर १८१७२ विद्यार्थी हेे उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९५.२४ एवढी आहे.नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने निकालात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी विज्ञान शाखेतून आदेश शरद देशमुख 95.50%(573) गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर कु. लीना दुर्योधन मडावी 93.67% (562) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय व मुलींमधून प्रथम ठरली आहे. याच प्रमाणे कला शाखेतून कु. प्रेरणा अशोक दहिवले 90% (540) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय आली आहे. आदेश देशमुख हा विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा शाळेतून प्रथम आला होता हे विशेष.

जिल्ह्यातील ११६ विद्यालयांनी विज्ञान,वाणिज्य व कला शाखेत १०० टक्के निकाल दिला आहे.यामध्ये कला शाखेचे १९,टेक्नीकल १, व्होकेशनल २,वाणिज्य शाखेत ७ तर विज्ञान शाखेचा ८७ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.यात जिल्हा परिषद व शासकीय आश्रमशाळांनी निकालाच चांगली भरारी घेतली आहे.

गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्याचा सर्वाधिक निकाल ९७.८१ टक्के असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.द्वितीय क्रमांक सडक अर्जुनी तालुक्याने ९६.७९ टक्के निकाल लावून पटकावला आहे.तर तृतीय क्रमांक ९५.३६ टक्के निकाल लावत तिरोडा तालुक्याने पटकावला आहे.सर्वाधिक कमी निकाल गोरेगाव तालुक्याचा ९१.९७ टक्के लागला आहे.

गोंदिया तालुक्यात ६५६७ विद्यार्थी परिक्षेकरीता नोंदणी करण्यात आले होते.त्यापैकी ६५४४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून ६२१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गोंदिया तालुक्याचा निकाल ९५.०३ टक्के असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९६.२६ आहे.आमगाव तालुक्यात १७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली,त्यापैकी १७४० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून १६४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.आमगाव तालुक्याची निकालाची टक्केवारी ९४.७७ टक्के असून तालुक्यात मुलींचे प्रमाण ९६.७० टक्के आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात २४३३ विद्यार्थ्यांनी नोंंदणी केली.त्यापैकी २४१२ परिक्षेत सहभागी झाले.तर २३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याची टक्केवारी ९७.८१ असून मुलींची टक्केवारी ९८.७५टक्के आहे.देवरी तालु्क्यात १२३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.त्यापैकी १२३१ परिक्षेत सहभागी झाले व ११६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.निकालाची तालुक्याची टक्केवारी ९४.८८ असून मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.४७ आहे.गोरेगाव तालुक्यात १६११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली,त्यापैकी १६०८ विद्यार्थी परिक्षेला बसले.यातील १४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९१.९७ एवढी आहे.तर मुलींची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे.सडक अर्जुनी तालुक्यात १६२९विद्यार्थ्यांनी नोंदणी केली,त्यापैकी १६२४ परिक्षेला बसले.तर १५७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याची टक्केवारी ९६.७९ आहे.तालुक्यात मुलींचे प्रमाण ९७.९७ टक्के आहे.सालेकसा तालुक्यातील १५०२ विद्यार्थीपैकी १४९३ परिक्षेला बसले.त्यापैकी १४११ विद्यार्थी विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले असून तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ९४.५० टक्के एवढी आहे.तालुक्यात ९६.१८ टक्के मुलींचे प्रमाण उत्तीर्ण होण्याचे आहे.देवरी तालुक्यातील २४२४ विद्यार्थ्यापैकी २४१८ विद्यार्थी परिक्षेला बसले आणि २३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ९५.३६ टक्के असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.५० टक्के एवढे आहे.

तिरोडा तालुका ९५.३६
शहिद मिश्रा जु.काॅलेज(व्होकेशनल) तिरोडा
एस.डी.बी.विद्यालय तिरोडा
अदिती आर्ट ज्यु.काॅलेज नवेगाव खुर्द
आदर्श कनिष्ट महाविद्यालय गोंडमोहाडी
एस.एन.सायंस ज्यु.काॅलेज सरांडी
सेजगाव ज्यु.काॅलेज सेजगाव
गणेश आटर्स व सांयस ज्यु.काॅलेज गुमाधावडा
जी.ई.एस.ज्युनियर काॅलेज नवेझरी
झेड.पी.कन्या ज्यु.काॅलेज तिरोडा
जिल्हा परिषद ज्यु.काॅलेज परसवाडा
सिध्दार्थ ज्यु.काॅलेज ठाणेगाव
भिवरामजी स्कुल व ज्यु.काॅलेज वडेगाव
सुभाष ज्यु.काॅलेज मुंडीकोटा
मानवता ज्यु,काॅलेज केसलवाडा
गुलाबटोला ज्यु.काॅलेज गुलाबटोला
गिरिजाबाई कन्या विद्यालय तिरोडा
जिल्हा परिषद ज्यु.काॅलेज वडेगाव
सी.जे.पटेल ज्यु.काॅलेज तिरोडा
शहिद मिश्रा ज्यु.काॅलेज तिरोडा
सालेकसा तालुका-९४.५०
जिल्हा परिषद हायस्कुल एण्ड ज्यु.काॅलेज साखरीटोला
नारायणभाऊ उच्च माध्य.विद्यालय लोहारा(आर्ट)
लालसिंग मच्छिरके ज्यु.काॅलेज कावराबांध
स्व.शंकरलाल अग्रवाल विद्यालय सालेकसा
शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाला बिजेपार
पंचशील विज्ञान ज्यु.काॅलेज मक्काटोला(आर्ट/सायंस)
शासकीय आश्रम शाळा पुराडा(आर्ट/सायंस)
शासकीय आश्रम शाळा जमाकुडो(आर्ट/सायंस)
सडक अर्जुनी-96.79
जिल्हा परिषद हाय.एण्ड ज्यु.काॅलेज सडक अर्जुनी
रविंद्र ज्यु.काॅलेज
श्रीकृष्ण अवधूत आदिवासी उच्च माध्य.आश्रमशाळा कोकणा
जी.ई.एस.आटर्स,काॅमर्स एण्ड सायंस काॅलेज सडक अर्जुनी
शासकीय उच्च माध्य.आश्रमशाळा शेंडा(आर्ट/सायंस)
सचिन लंजे कला विज्ञान महाविद्यालय सडक अर्जुनी
एच.टी.कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सडक अर्जुनी
पार्थ कनिष्ट महाविद्यालय सडक अर्जुनी
सावित्रीबाई मस्के ज्यु.काॅलेज खोडशिवनी
स्व.बनारसीदास अग्रवाल ज्यु.काॅलेज सडक अर्जुनी(आर्टस)
फुलीचंदजी भगत कनिष्ट महाविद्यालय कोसमतोंडी
आदिवासी विकास हाय.व ज्यु.काॅलेज खजरी(डोंगरगाव)
वसंतराव ज्यु.काॅलेज डोंगरगाव सडक
आर.जे.लोहिया विद्यालय सौंदड
गोरेगाव तालुका-91.97
माॅडेल सायंस ज्यु.काॅलेज गोरेगाव
किरसान मिशन ज्यु.काॅलेज गोरेगाव
जी.ई.एस.ज्यु.काॅलेज मोहाडी
पी.डी.रहागंडाले.ज्यु.काॅलेज गोरेगाव
एम.आय.पटेल हाय.व ज्युु.काॅलेज सोनी(आर्टस/सायंस)
रामकृष्ण ज्यु.काॅलेज कुर्हाडी
रविंद्र ज्यु.काॅलेज चोपा
देवरी तालुका ९४.८८
शिवराम विद्यालय तथा क.महाविद्यालय मरामजोब
शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय देवरी
शासकीय उच्च मुलींचे आश्रमशाळा बोरगाव बाजार
शासकीय उच्च आश्रमशाळा कडीकसा
रुक्मीणीदेवी अग्रवाल ज्यु.काॅलेज ककोडी
महात्मा गांधी ज्यु.काॅलेज पालांदूर जमी.(आर्टस)
श्रीराम आर्टस ज्यु.काॅलेज चिचगड
अर्जुनी मोर तालुका-97.81
अमित ज्यु.काॅलेज अर्जुनी मोर
प्रगती ज्यु.काॅलेज इळदा(परसटोला)(आर्टस/सायंस)
जी.एम.बी.ज्युु,काॅलेज अर्जुनी मोर
श्री समर्थ आदिवासी उच्च माध्यमिक विद्यालय
नत्थुजी पुस्तोडी अनु.आदिवासी आश्रमशाळा देवलगाव
विदर्भ विज्ञान क.महाविद्यालय कनेरी केशोरी
नुतन हिंदी हाय.व ज्यु.काॅलेज अर्जुनी मोर
स्वामी विवेकानंद वाणिज्य  महाविद्यालय इटखेडा(वाणिज्य)
जयदुर्गा ज्युनियर काॅलेज गौरनगर
स्व.भगिरथीबाई डोंगरवार ज्यु.काॅलेज नवेगावबांध
उमाबाई संग्रामे ज्यु काॅलेज नवेगावबांध (आर्टस/सायंस)
मानवता ज्यु काॅलेज बोंडगावदेवी
पी.डी.ज्यु.काॅलेज येरंडी
सरस्वती ज्यु.काॅलेज अर्जुनी मोरगाव(आर्टस/सायंस)
नवदोय आर्टस ज्यु.काॅलेज केशोरी
जिल्हा परिषद ज्यु.काॅलेज नवेगावबांध
एस.नाईक ज्यु्.काॅॅलेज बोळदे करड(आर्टस)
जिल्हा परिषद ज्यु.काॅलेज अर्जुनी मोर(आर्टस /सायंस)
आमगाव तालुका-94.77
राजीव गांधी विद्यालय वडद (आर्टस /सायंस)
स्व.राधादेवी शर्मा ज्यु.काॅलेज बोरकन्हार
माऊली कला व विज्ञान महाविद्यालय कातुर्ली
श्री तुकाराम कनिष्ट महाविद्यालय भोसाा
श्री गजानन महाराज कला क.महाविद्यालय घाटटेमणी
आदर्श ज्यु.काॅलेज आमगाव
गोंदिया तालुका-95.30
सुदामा ज्यु.काॅलेज आसोली(व्होकेशनल)
शासकीय आय़टीआय फुलचूरपेठ(टेक्नीकल)
माॅ.शारदा इंटर इंग्लीश स्कुुल नागरा
पी.आर. इंग्लीश स्कुल नवरगाव कला
शारदा काॅन्व्हेंट इंग्लीश स्कुल गोंदिया(सायंस/काॅमर्स)
श्री.राधेय ज्यु.काॅलेज गोंदिया
स्वामी टेऊराम आदर्श इंग्लीश स्कुल गोंदिया
एक्युट पब्लीक स्कुल गोंदिया (सायंस/काॅमर्स)
लिटल फ्लावर सायंस ज्यु.काॅलेज गोंदिया
संत कबीर सायंस ज्यु.काॅलेज
साकेत ज्युनियर काॅलेज गोंदिया (सायंस/काॅमर्स)
पराग आर्ट.सायंस ज्यु काॅलेज
स्व.के.डी.भाष्कर ज्यु.काॅलेज डांगोर्ली
फुंडे सांयस ज्यु.काॅलेज फुलचूर
प्रोगेसिव्ह ज्युु.काॅलेज गोंदिया
मनोहरभाई पटेल सैनिक स्कुल गोंदिया
खुशाल कापसे सायंस ज्यु.काॅलेज तांडा
एड.लालचंद विद्यालय दासगाव
महात्मा ज्योतीबा फुले वाणिज्य,क महा.काटी( कामर्स/आर्टस)
स्व.के.के.इंगले ज्यु.काॅलेज गोंदिया
युवराजसिंग कला कनिष्ठ महा.चुटिया(सायंस/आर्ट)
स्व.शंकरलाल अग्रवाल विद्यालय  बिरसोला काटी
विवेक मंदीर ज्यु.काॅलेज गणेशनगर गोंदिया(सायंस/काॅमर्स)
श्री.संत ज्ञानेश्वर आर्टस ज्यु.काॅलेज दतोरा
राष्ट्रीय ज्युनियर काॅलेज डोंगरगाव
शांताबेन मनोहरभाई पटेल ज्युनीयर काॅलेज गोंदिया (सायंस/काॅमर्स)
राष्ट्रीय ज्युनियर काॅलेज सतोना
शासकीय आदिवासी आश्रमशाळा मजीतपूर
सुदामा ज्युनियर काॅलेज नागरा(आर्टस)
बी.एन.आदर्श सिंधी विद्यालय गोंदिया(आर्टस)
जी.ई.एस.ज्युनियर काॅलेज दासगाव
जी.ई.एस.ज्युनियर काॅलेज रावणवाडी
सौ.अर्चना पी.कन्या ज्यु.काॅलेज दासगाव(बु.)
जी.ई.एस.आर्टस ज्यु.काॅलेज पांढराबोडी
विमलताई सायंस ज्यु.काॅलेज कटंगीकला
जी.ई.एस.ज्यु.सायंस काॅलेज कामठा
एस.एस.गल्स ज्यु.काॅलेज गोंदिया