महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वी च्या निकालाची तारीख ठरली ! या तारखेला जाहीर होणार निकाल

0
63

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. 21 मे 2024 ला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे.

 

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे च्या चौथ्या आठवड्यात जाहीर करू असे म्हटले होते.

 

दरम्यान आता या लाखो विद्यार्थ्यांच्या निकाल येत्या तीन दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज आपण निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला निकाल कुठे पाहू शकतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

निकाल कुठं पाहणार?

 

वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे दहावीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकायचे आहे.

यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट पाहता येणार आहे. ज्यांना ऑफलाइन निकाल बघायचा असेल ते एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहू शकतात.

यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जायचे आहे. यात MH10 लिहून पुढे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. मग हा मॅसेज तुम्हाला 57766 वर पाठवायचा आहे. हा एसएमएस पाठवल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला SMS केला जाईल.