संत श्री रविदास बाबा चर्मकार समाजाच्यावतीने मुंडीपार ग्रा.पं. सरपंचाना निवेदन

0
8

गोरेगांव: -तालुक्यातील ग्रा.पं.मुंडीपार येथील वार्ड क्र.१ मध्ये स्थित असलेल्या श्री संत शिरोमणि रविदास महाराज यांच्या प्रतिमेजवळ विद्युतची व्यवस्था नसल्यामुळे रोज सांयकाळी त्रास सहन करावा लागतो.तसेच मंदिर परिसरात बसण्यासाठी सुद्धा खुर्चीची व्यवस्था व मोकळ्या जागेत गट्टु लावण्यात यावे करिता संत श्री रविदास बाबा चर्मकार समाजाच्या वतीने मुंडीपार ग्रा.पं. सरपंच सौ.प्रेमलता राऊत,सचिव अरविंद साखरे व ग्रा.पं सदस्य जावेद(राजाभाई)खान,ग्रा.पं. सदस्या संगिता सरजारे यांना निवेदन देण्यात आले.
संत गुरु रविदास महाराज यांनी ६०० वर्षापूर्वी बंधुभाव समतेचे व समानतेचे मोठे कार्यक्रम केल्याने आज संपूर्ण जगात संत गुरु रविदास महाराजांचे अनुयायी प्रेरणा घेऊन कार्य करित आहेत.निवेदन देतेवेळी संत श्री रविदास बाबा चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटेलाल गमधरे,भाऊदास गमधरे,सुभाष गमधरे,शेखर गमधरे आदी समाज बांधव उपस्थित होते.