16 शाळांचा निकाल 90 टक्क्यापेक्षा अधिक ; शिक्षक पालकांत आनंद
गोंदिया, ता. 28 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्हा परिषदेच्या एकूण 22 शाळेतील 470 विद्यार्थी प्राविण्यसूचीत आले असून 536 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरूगानंथम यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हयात एकूण 22 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधून इयत्ता दहावीमध्ये एकूण 1358 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. जिल्हयातील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बनाथर, काटी, सौंदड, नवेगावबांध, बोंडगावदेवी, गांगला शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर 16 शाळांचा निकाल 90 टक्क्यापेक्षा अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे, बनाथर येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्वाधिक 42 विद्यार्थ्यांनी प्राविण्यसूचीत स्थान प्राप्त केले. त्याखालोखाल गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या माध्यमिक शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सडक अर्जुनी येथील 38, जिल्हा परिषद शाळा सुकळी डाकराम येथील 37, भारतीय विद्यालय एकोडी आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परसवाडा येथील प्रत्येकी 36, जिल्हा परिषद शाळा वडेगाव येथील 31, जिल्हा परिषद शाळा तिरोडा येथील 27 विद्यार्थ्यांनी प्राविण्यसूचीत स्थान मिळविले. यासोबतच जिल्हा परिषद शाळा देवरी 27, जिल्हा परिषद शाळा सौंदड 26, जिल्हा परिषद शाळा नवेगावबांध 17, जिल्हा परिषद शाळा काटी 14, जिल्हा परिषद शाळा दवनिवाडा येथील 12, जिल्हा परिषद शाळा कट्टीपार नऊ, जिल्हा परिषद शाळा आमगाव सहा, जिल्हा परिषद शाळा ककोडी दोन, जिल्हा परिषद शाळा अर्जुनी मोरगाव नऊ, जिल्हा परिषद शाळा बोंडगावदेवी पाच, जिल्हा परिषद शाळा कावराबांध 10 तर जिल्हा परिषद शाळा साखरीटोला येथील 11 विद्यार्थी प्राविण्यसूचीत आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 266 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच शिक्षण घेतात. या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटीबध्द आहे. शैक्षणिक विकासासाबद्दल पालकांनी जागरूक राहावे, आपले पाल्य सुध्दा गुणवत्ता यादीमध्ये येवून मोठमोठया पदांवर जाऊ शकतात, असा आत्मविश्वास बाळगावा, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरूगानंथम यांनी व्यक्त करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.जिल्हा परिषद अध्यक्ष पकंज रहागंडाले,उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती इंजी.यशवंत गणवीर, शिक्षणाधिकारी (प्राथ.)सुधीर महामुनी,शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. महेंद्र गजभिये, यांनी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दहावीच्या निकालावर आनंद व्यक्त करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.