गोरेगाव,दि.२८ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव(बु) शाळेचा निकाल ९८.६० टक्के लागला असून विद्यालयातून ७४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते.त्यापैकी ७३ उत्तीर्ण झाले असून २८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आले.प्रथम श्रेणीत २२ व व्दितीय श्रेणीत १७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.विद्यालयातून तसेच परीक्षा केंद्रातून कु. शाश्वती पटले हिने 90.80 टक्के गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकावला.तर व्दितीय क्रमांक कु.सिमरन गजभिये हिने 90.40 टक्के गुण घेत पटकावला.तृतीय क्रमांक कु. मिनल गौतम व कु. आचल शहारे या दोघींनी 85.80 टक्के गुण मिळवित संयुक्त पटकावला आहे.चतुर्थ क्रमांक कु.हर्षा चन्ने हिने 85.40 टक्के गुण मिळवित पटकावला.त्यासोबतच कु.जानवी चौहान 84.60%,कु.भारती कटरे 83.20%,कु.शुभांगी रहांगडाले 82.00%,कु. विशाखा अंबुले 81.00%,आदित्य हरिनखेडे 81.00%,युग पटले 80.00%,कु.रूचि कटरे 80.00%,कु.काजल दिवटे 80.00%,कु.खुशबू पटले 80.00%,कु.तेजश्विनी चंडेमेश्राम 80.00%,कु.तनुश्री गोंडाने 79.80%,कु.साक्षी कुसराम 79.80%,कु.प्रणाली राणे 79.20%,कु.प्रीती रहांगडlले 79.20%,कु.अश्विनी पटले 78.40%,धीरज चौधरी 78.40%,कु.आँचल मरकम 78.20%,कु.सुहानी बागड़े 77.20%,कु प्राची शाहारे 75,80%,कु.शीतल पटले 75,80%,कु.कावेरी महंतो 75,40% व आकाश चंडेमेश्राम 75,00% या विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.विद्यालयातील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रविकांत बोपचे,संस्थेचे सचिव डाॅ.खुशालचंद्र बोपचे,प्रभारी मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.