ओबीसी विद्यार्थ्यांकरीता आधार योजना सुरू,१५ जुर्लेपर्यंत अर्ज करा

0
12939

सन 2024-25  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले करीता अर्ज आमंत्रित

गोंदिया दि.23 :- राज्यातील विविध महाविदयालयात शिक्षण घेत असलेल्या ओबीसी प्रवर्गातील व्दितीय,तृतीय,चतुर्थ वर्गातील विद्यार्थ्यांकरीता सन-2024-25 या सत्रापासुन “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेसाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष प्रवर्गातील 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या सन-2024-25 या सत्रामधील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनकरीता सन-2024-25 या सत्रापासुन “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” या योजनेसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे. सदर अर्ज राज्यातील सर्वच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन येथे व संंबधित विभागाच्या वसतीगृहात उपलब्ध करण्यात आले आहे.

तरी सदर योजनेसाठी दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावे.

  1. जात प्रमाणपत्र बंधनकारक
  2. अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, (पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे)
  3. आधार कार्ड
  4. सदरचा विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
  5. 12 वी मध्ये 60% गुण मिळालेले विद्यार्थीच या योजनेस पात्र राहतील.
  6. परिक्षेचे गुणपत्रक
  7. महा. वोनाफाईड सर्टिफिकेट
  8. बँक खाते आधार संलग्न केल्याचा पुरावा
  9. स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
  10. सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.
  11. विद्यार्थी जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इ. महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र आदी.)
  12. सदर योजनेअंतर्गत एकुण प्रवेश संखेच्या 70 टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी व 30 टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी असतील.
  13. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांस या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
  14. सदर योजनेअंतर्गत 2024-25 करीता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विदयार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विदयार्थी अशा रितीने प्रती जिल्हा 600 विदयार्थ्यांना/विदयार्थ्यांना, लाभ देण्यात येईल. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे सहायक संचालक, इतर मागास, बहुजन कल्याण यांच्याकडे विहत नमुन्यात अर्ज करावा लागेल.
  15. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश सुरू

राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्यांमध्ये ७२ वसतिगृह सुरु करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने हिवाळी अधिवेशनात केल्याप्रमाणे राज्यातील जिल्हयात मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० विद्याधी क्षमतेचे दोन उसतिगृह सुरु करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने ओवीसी पाल्याण विभागाने पत्र काढून विद्याथ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशाकरिता ऑफलाईन अर्ज मागविले आहेत. ओ.पी.सी., व्ही.जे.एन.टी व एसवीशी प्रवर्गातील विद्यार्थी हे या वसतिगृहात प्रवेशाकरिता अर्ज करु शकतात.सदर प्रवेश अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे उपलब्ध असून विद्यार्थ्यांना ते विनामूल्य देण्यात येतील. अर्ज खालील अटी शर्तीचे अधिनतेवर देण्यात येतील.

१. विद्यार्थ्यांचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे व स्थानिक वसतीगृहाचे ठिकाण असलेल्या शहरातील रहिवासी नसावा.

२. अर्ज घेतेवेळी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक मूळ / साक्षार्कित प्रत (मार्कशिट, टी.सी., जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र) घेऊन घेणे आवश्यक आहे.

३. विद्यार्थ्यांला इयत्ता १२ वी चे परिक्षेत ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

४. पालकाची उत्पन्न मर्यादा २.५ लाख असावी.

५. अर्जदार हा इमाय, विजाभज, विमाप्र, आर्थिक मागास प्रवर्गातील असावा.

६. अर्जदार हा व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रम घेणारा असावा.

            वसतिगृहातील १०० जागांचे आरक्षण खालीलप्रमाणे राहील.

वसतिगृहनिहाय रिक्त जागांमध्ये इतर मागासवर्गाकरिता ५८ जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती ३१, विशेष मागास प्रवर्ग ०६, ई डब्ल्यु एस ४, दिव्यांग ४, अनाथ २ तर खास बाबीसाठी ५ अशा प्रत्येक वसतिगृहात १०० जागा राहणार आहेत.

विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, वरील १ ते ६ अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्याथ्यांनी अर्ज संपूर्ण कागदपत्रांच्या झेराक्स प्रतीसह सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन येथे त्वरीत सादर करावे.