युवाशक्ती मंडळाचे अपघाती कुटुंबाला आर्थिक मदत,मंडळाच्या स्तुत्य उपक्रम

0
147
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोरगाव,दि.२३ःयुवाशक्ती बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळाचे सदस्यांचे अपघाती निधन झाले . कुटुंबाप्रति सहृदयता मंडळातील पदाधिकारी व्यक्त करून कुटुंबप्रमुखास एक हजार रुपयाचे अनुदान मृतकाचे आईला देऊन कुटुंबाप्रती संवेदना अर्पण केल्या.
इटखेडा येथील युवाशक्ती मंडळाचे सदस्य भागवत अंबादास ठाकरे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. घरात फक्त आई असल्याने कुटुंबाप्रती सांत्वन व्यक्त करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल जीरित्कार यांनी एक हजार रुपयाची आर्थिक मदत मंडळातर्फे त्याची आई गीता ठाकरे यांच्याकडे देऊन दुःखात सोबत असल्याचे सांगितले .यावेळी सर्वेस धांडे ,मोरेश्वर मीसार, तोराम राजगडे, सुधीर कुंभलवार ,दिवाकर राऊत व इतर उपस्थित होते.