गोंंदिया,दि.२३ःअर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण विभागाचे सभापती असलेले इंजि.यशवंत गणवीर गेल्या सव्वा दोन वर्षापासून या पदावर कार्यरत आहेत.मात्र आपल्या तालुक्यातील शाळांना सुसज्ज करण्यासोबतच रिक्त शिक्षकांची पदे भरण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.आजही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळामंध्ये ६८ शिक्षकांची पदे रिक्त पडली आहेत.त्यातही वर्ग १ ते ५ च्या ३२ शाळेत तर फक्त एकच शिक्षक कार्यरत तप ३ शाळा तर शिक्षकाविना आहेत.
अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत २०२३-२४ च्या संचमान्यतेननुसार उच्च श्रेणी मुख्याध्यापक 17,भाषा विषय 43,गणित/विज्ञान 44,सामाजिक शास्त्र 4,प्राथमिक शिक्षक 328 अशी एकूण 432 पदे मंजूर असून ३६७ पदे सध्या कार्यरत आहेत.तर ६८ पदे रिक्त आहेत.त्यामध्ये भाषा विषयाचे 12,गणित/विज्ञान 2,सामाजिक शास्त्र 2,प्राथमिक शिक्षकांच्या 52 पदांचा समावेश आहे.
शिक्षण सभापतीच्याच तालुक्यात शिक्षकाविना शाळा असल्याने इतर तालुक्यातील शाळांची काय परिस्थिती असेल हे सांगणे कठिणच आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकां अभावी शिक्षण कार्य पूर्णतः खोळंबले आहे. तरीसुद्धा गोंदिया जिल्हा परिषदेकडून तालुक्याला नवीन शिक्षक देण्यात दुर्लक्ष करण्यात आले आहे.शिक्षण सभापतीवर सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी वरचढ ठरल्यानेच या तालुक्यात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात सभापती कमी पडले असे म्हणने वावगे होणार नाही.