अर्जुनी मोर.दि.०७ः-जिल्हा परिषद गोंदिया मार्फत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण 5 सप्टेंबरला वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे करण्यात आले.यात जिल्हास्तरीय उत्कृष्ट विशेष शिक्षक या विभागातून अर्जुनी मोर. येथील पिएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जुनी मोर. क्र.1 येथील सहा.शिक्षिका कु. सरिता देवराम घोरमारे यांना स्मृतिचिन्ह प्रदान करुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले तर उद्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरूगानंथम होते.विशेष अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष व शिक्षण सभापती यशवंत गणवीर,सभापती सविता पुराम,सभापती पूजाताई अखिलेश सेठ,गटनेते लायकराम भेंडारकर,माध्य.शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये,प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन कु. सरिता घोरमारे यांना गौरविण्यात आले. माझा हा पुरस्कार मी माझ्या बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांना समर्पित करते असे मनोगत सरिता घोरमारे यांनी व्यक्त केले.शाळेतील मुख्याध्यापक विनोद मेश्राम यांनी सहा.शिक्षीका कु.घोरमारे यांचे कार्याबद्दल गोरवोद्गार काढले. शाळेतील शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.