२५ लक्ष रुपयाचा १६७.१०० किलो गांजा पकडला

0
282

भंडारा :- ओरीसा राज्यातून महाराष्ट्रातील नाशिक येथे चारचाकी वाहनातून ७ प्लॉस्टीक बोरीत नेत १६७.१०० कि. ग्रॅम गांजा किंमत २५ लाख ६ हजार ५०० रुपये व चारचाकी वाहन किंमत २० लाख रुपये असा एकूण ४५ लक्ष ६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल भंडारा पोलिसांना जप्त केला. ही घटना दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री १.१५ ते ३.१० वाजताच्या दरम्यान घडली.सुमित सुभाष धोरवे (३३) रा. आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे, रविंद्र कृष्णा शिंदे (३६) रा. गंगापूर रोड शिवश्रृष्टी कॉलनी नाशिक, तुषार भोसले रा. आडगाव शिवार नाशिक, सुजर नावाचा इसम रा. नाशिक असे आरोपींचे नाव आहे.

पोलिसांना एक ग्रे रंगाची महिंद्रा एक्सयुव्ही ५०० क्र. एमएच १५ ई. पी. ४३७२ ने दोन इसम हे भंडारा मार्ग नागपूर रोडनी गाजांची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. लगेच भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी यांनी सदर कार्यवाही करीता पथक नेमून वाहनाचा नागपूर हायवे लग परीसरात शोध घेतला. सदर वाहन ही बिटीबी मार्केट परीसरातील यार्ड मध्ये पार्कीग केलेले दिसून आले. वाहनामध्ये दोन इसम मिळाले. त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांचे नाव सुमित सुभाष धोरवे (३३) रा. आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे व रविंद्र कृष्णा शिंदे (३६) रा. गंगापूर रोड शिवश्रृष्टी कॉलनी नाशिक असे सांगितले.

दोघांवरही पोलिसांचा संशय आल्याने त्यांचे गाडीची तपासणी केली असता गाडीचे मागील भागात एकूण ७ पांढऱ्या रंगाचे प्लास्टीक बोरी दिसून आल्यात. लगेच याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांना दिल्यानंतर त्यांनी एन. डी. पी. एस. कायद्याचे तंतोतंत पालन करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. गाडीतील प्लास्टीक बोरीची पाहणी केली असता त्यात कडीदार देठं असलेला, उग्र वास येणारा ओलसर चामट असा गांजा मिळून आला.

दोन्ही आरोपींनी गांजा हा तुषार भोसले व सुरज यांचे सांगणेवरून ओरीसा राज्यातून आणला असून नाशिक येथे घेऊन जाणार असल्याची माहिती दिली. गांच्याचे वजन केले असता १६७.१०० कि. ग्रॅम किंमत २५ लाख ६ हजार ५०० रुपये आहे. तसेच गाडी किंमत २० लाख रुपये असा एकूण ४५ लक्ष ६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धोरवे (३३) रा. आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे, रविंद्र कृष्णा शिंदे (३६) रा. गंगापूर रोड शिवश्रृष्टी कॉलनी नाशिक यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे कलम ८ (सी), २० (बी एक्सदोन), २९ एन. डी. पी. एस. कायदा सन १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाच्या पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोकुळे सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक दिपक चालुरकर, परी. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे, हवालदार क्रिष्णा बोरकर, बालाराम वरखडे, विजय डोयले, नायक अजय कुकडे, सुनिल राठोड, शिपाई नरेंद्र झलके, कोमल ईश्वरकर, हवालदार राजेश पांडे ,महेश सुर्यवंशी यांनी केले.