देसाईगंज: कारमेल अक्याडमी आमगाव मध्ये १४ सप्टेंबर ‘हिंदी दिवसाचे’ औचित्य साधून हिंदी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषेचे महत्व व भाषेचा गौरव यासाठी जागृत करण्याकरिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून सकाळची प्रार्थना हिंदीमध्ये आयोजित करण्यात येत आहे. व्यसनमुक्ती व स्वच्छता यावर लघुनाटीका, संत तुकडोजी महाराज यांची सामूहिक प्रार्थना, मुहावरे व दोहे यावर आधारित अंताक्षरी ,भाषण ,निबंध, कथा व कविता या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्याचे हिंदी भाषेमधील कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
दिनांक ९ ला वर्ग १ ते ४ ची रॅली काढण्यात आली यामध्ये हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारे नारे देऊन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर जिनेश मॅथ्यू ,उपमुख्याध्यापिका सिस्टर लिटी ,शिक्षक प्रमुख दिशाली चावके, हिंदी विभाग प्रमुख रितू श्रीवास्तव व हिंदी शिक्षक- शिक्षिका सोनाली नुनेवार ,गीता गहाणे ,तृषा भैय्या ,अमोल रोहनकर या सर्वांनी सहभाग दर्शविला.