गोरेगाव,दि.१३ः-राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पाक्र.2’अभियान राबविण्यात येत असून या स्पर्धात्मक अभियानात खाजगी व्यवस्थापनामध्ये स्व.ब्रिजजलाल कटरे हायस्कूल शहारवानीने गोरेगांव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शाळेने अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता,विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास , शासकीय योजनांचा लाभ,इत्यादी अशा अनेकविध घटकांचा व उद्दिष्टांवर काम करत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्याबाबत सहाय्यक गटविकास अधिकारी गौतम,पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम.डी.पारधी,विस्तार अधिकारी श्री.बिसेन,श्री.बोपचे,केंद्रप्रमुख श्री.बिसेन,साधनव्यक्ती श्री.बहेकार,श्री.ठाकरे,कवलेवाडा द्रपरमुख मंजू वैष्णव,संस्थेचे अध्यक्ष एड.टी.बी.कटरे,सचिव यू.टी.बिसेन यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.तसेच
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या यशस्वीतेकरीता सरपंच सचिन मेश्राम,उपसरपंच तुकाराम गौतम,पोलीस पाटील तेजलाल पटले,तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश नेवारे,सेवा सहकारी अध्यक्ष माणिकलाल गौतम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमलताताई भगत,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्रीमती पटले,मातापालक संघ उपाध्यक्ष श्रीमती डोंगरे,श्रीमती कटरे,श्रीमती तुरकर,श्रीमती पटले,माजी विद्यार्थी,पालक वृंद, ग्रामवासी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आर.वाय.कटरे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले आहे.