झालीया केंद्रप्रमुखपदी निवड झालेल्याची नियुक्ती रद्द करीत श्रृती चॅटर्जींना दिली संंधी

0
1636

गोंदिया,दि.१५ः– गोंंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीनेे १३ सप्टेंबरला जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात जिल्हास्तरिय केंद्रपमुख निवडीकरीता समुपदेशन कार्य़शाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत ज्या शिक्षकांने आदी केंंद्र स्विकारले त्यांनी नंतर नकार दिल्याने व ज्यांनी यादीतील केंद्रशाळा नाकारली त्यांनाच परत त्या केंद्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या डोळ्यात धुळ फेकत नियुक्ती दिल्याचे प्रकरण समोर आल्याने केंद्रप्रमुख निवडीत राजकीय घोळ झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगंथम यांनी चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे.या कार्यशाळेत ३२ शिक्षकांची केंद्रप्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून या निवड प्रकियेत राज्यातील महायुतीसरकारमधील एका पक्षाच्या नेत्याने हस्तक्षेप केल्याची चर्चा सुरु झाली आहे.गोंदिया तालुक्यात दिव्यांगाना स्थान म्हणून भानपूर प्रथम,आसोली केंद्र देण्यात आले.त्यानंतर नुरजहा पठाण यांचे नाव प्रथम क्रमांकावर असल्याने दासगाव केंद्र देण्यात आल्यांनंतर गोंंदिया तालुका बंंद करण्यात आले.त्यानंतर गोंदिया तालुक्यात कशी नियुक्ती करण्यात आले अशा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या कार्यशाळेत सालेकसा तालुक्यातील झालीया केंंद्राकरीता यादीनुसार गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या दतोरा जिल्हा परिषद शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अनिरुध्द मेश्राम यांची निवड करुन त्यांना झालिया केंंद्र देण्यात आले.त्यानंतर आलेल्या ठाणा जिल्हा परिषद शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्रृती चॅटर्जी यांनी सालेकसा व आमगाव तालुक्यातील केंद्र मिळत नसल्याचे बघून नकार दिला.हे सर्व सोपस्कार कार्यशाळेत व्यवस्थित पार पडलेले असताना कार्यशाळा संपत आल्यावर मात्र मेश्राम यांनी झालीया केंद्र बदलून मागितल्याने आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा ठाणा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्रुती चॅटर्जी यांना झालीया केंद्र देत मेश्राम यांना गोंदिया पंचायत समितीतील नंंगपूरा मुर्री हे केंद्र देण्यात आले.जेव्हा की गोंदिया तालुक्यातील पद भरती बंद करण्यात आली,त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरगंथम व शिक्षणाधिकारी महामुनीसह इतर अधिकारी उपस्थित होते.त्यानंतर झालेल्या बदल यादीमुळे अनेक शिक्षकांनी नंतर केंद्रप्रमुख पद स्विकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

कार्यशाळा संपल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंधारात ठेवत झालीया केंद्र प्रमुख म्हणून श्रृती चॅटर्जी यांची नियुक्ती करण्यात आल्याने या कार्यशाळेत नकार दिलेल्यांना परत त्या केंंद्रावर देण्यामागचा उ्ददेश काय याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. शिक्षक तसेच केंद्राप्रमुखांच्या पदोन्नती शिक्षणाधिका-यांद्वारे केल्या जात आहेत. मात्र शासनाने ठरविलेल्या अटी व शर्तीप्रमाणे समुपदेशन करणे अनिर्वाय असतांना असे न करता शिक्षणाधिकार्यानी प्रशासनाला अंधारात ठेवून मनमर्जीने नियुक्ती करीत असल्याचा आरोप शिक्षक वर्गातून होत आहे.

केंद्रप्रमुख निवड प्रकिया योग्यच- प्राथ.शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी

जिल्हास्तरीय केंद्रप्रमुख कार्यशाळेत योग्यप्रकारे निवड करण्यात आली असून अनिरुध्द मेश्राम यांचे नाव आदी असल्याने त्यांनी झालिया केंद्र स्विकारले.मात्र नंतर काही वेळाने झालिया केंद्र बदल करुन मागितल्याने त्यांच्याएैवजी श्रृती चॅटर्जी यांना झालीया केंद्र देण्यात आले.तर मेश्राम यांना गोंदिया तालुक्यात नंगपूरा मुर्री देण्यात आल्याचे सांगत प्रकियेत कुठलाच  घोळ झाला नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी बेरार टाईम्सला सांगितले.