अर्जुनी मोरगाव,दि.२१–स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दूरदृष्य प्रणाली द्वारे झाले. या उद्घाटकीय कार्यक्रमाला दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लूणकरन चितलांगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले आयोजन समिती समन्वयक डॉ.डी. एल.चौधरी, जिल्हा समन्वयक संदिप टेंभूर्णे,आयक्यूएसी समन्वयक डॉ.के.जे.सीबी, आयोजन समितीचे सर्व सदस्य, निरिक्षक राऊत, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पत्रकार, पालक वर्ग, गावातील नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अंतर्गत महाविद्यालयात चार प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.
सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन , लॅक कल्टीवेटर , गार्डनर कम नर्सरी रेजर आणि डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांची एकूण प्रवेश क्षमता 150 विद्यार्थ्यांची असून सदर अभ्यासक्रम निशुल्क आहेत. कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता आयोजन समिती समन्वयक डॉ.डि.एल.चौधरी, प्रा.अजय राऊत,डॉ.गोपाल पालीवाल,प्रा. अंकित नाकाडे, डॉ.नितीन विलायतकर,प्रा.शेखर राखडे,प्रा.कापगते प्रा.भगत,संजय शेंडे,अमरदीप शेंडे,शुभम शहारे.श्रीकांत घरत,बादल लाडे,मनोज झोडे यांनी सहकार्य.