शिवसेना उबाठा गटात माजी युवा सेना प्रमुख कगेश रावचा प्रवेश

0
78

गोंदिया,दि.२१ः- जिल्ह्यातील शिवसेना माजी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख व  शिंदे सेना गटाचे कर्मठ कार्यकर्त्ता कगेश राव यांनी आमगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब गटात प्रवेश केला.राव यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवत जिल्ह्यात ठाकरे सेना बळकट करण्याचा संकल्प यावेळी घेतला.याप्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख शैलेष जायस्वाल यांच्यासह अनेक शिवसेेना नेते उपस्थित होते.