मुंबई,दि.२३ः विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्य निवडणूकीचे मतदान येत्या रविवारी, दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित होते. शेवटच्या घटकेला विद्यापीठ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडून निवडणूक प्रक्रिया अस्थायी कालावधीसाठी स्थगित करणे हा लोकशाहीचा बळी आहे.
सुरळीत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या विद्यापीठाचा हा निर्णय पदवीधरांसाठी अपमानास्पद आहे.
यावेळी अभाविप कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वारंवार दुर्लक्षित करत असतानाच स्वतःच्या राजकीय लोभपायी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकत मागील दोन वर्षांपासून प्रलंबित मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या विषयात अभाविपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार आहे’.
मुख्यमंत्र्याच्या दबावामुळे निवडणूकीचा बळी- अभाविप
वाढदिवसाच्या शुभेच्छा