खामगाव-आपल्या विद्यार्थ्यांना गणित विषय आवडीचा वाटावा,त्यांना गणित विषयात रुची वाटावी आणि गणिताविषयी भीतीच वाटू नये यासाठी जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता.खामगाव,जि.बुलढाणा येथे कार्यरत शिक्षक राजेश वासुदेव कोगदे यांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ,संख्या ज्ञान यासाठी विविध सोप्या पद्धती विकसित केलेल्या आहेत.आपल्या विद्यार्थ्यांना शंभरपर्यंत पाढे सोप्या पद्धतीने तयार करता यावे.त्यांची पाढ्यांची भीती दूर व्हावी यासाठी शिक्षक राजेश कोगदे यांनी आनंददायी पाढे निर्मिती कार्ड तयार केले.या कार्डाच्या माध्यमातून विद्यार्थी वीस ते तीस सेकंदात शंभरपर्यंतचा कोणत्याही पाढा तयार करु लागले.
परंतू काही विद्यार्थ्यांनी याच्याही पलीकडे जाऊन पाढे तयार करण्याची पद्धत शोधून काढली आणि चक्क दीड मिनिटात 91पासून तर 99 पर्यंतचे पाढे तयार केले.हे सर्व पाहून विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती विकसित होत असल्याचे पाहून शिक्षक राजेश कोगदे सरांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
विद्यार्थ्यांना गणितातील गणन क्रियेत प्रभुत्व प्राप्त व्हावे.पाढे निर्मिती किंवा पाढे पाठांतर त्यांना जणू काही खेळच खेळत आहोत असे वाटावे.विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती समूळ नष्ट व्हावी हाच उद्देश सदैव मी डोळ्यासमोर ठेवून नवनवीन उपक्रम राबवित असतो.
*राजेश वासुदेव कोगदे* शिक्षक जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर
संबंधित उपक्रमाची सखोल माहिती देणारा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे
शिक्षक राजेश कोगदेर यांनी तयार केलेले पाढे निर्मिती कार्ड या कार्डाच्या माध्यमातून विद्यार्थी तयार करतात 100पर्यंतचे पाढे केवळ 10-20सेकंदात.