नागपूर विद्यापीठाच्या ३६ परीक्षा पुढे ढकलल्या

0
24

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन १६ डिसेंबरला आयोजित केल्याने विद्यापीठाच्या ३६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. या समारंभात राज्यपाल प्रमुख अतिथी राहणार आहेत. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचा तिसरा टप्पा सुरू आहे. त्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विविध सेमिस्टरचा परीक्षांचा समावेश आहे.

दरम्यान विद्यापीठाच्या नियोजित तारखेनुसार १६ तारखेला जवळपास ३६ परीक्षांचा समावेश आहे. त्यात एमए, बीए, एमएस्सी, एम.लीब, बीबीसीए, बीएस्सी, बी.कॉम. या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यात हजारो विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. अशावेळी अचानक पेपर रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला.  दरम्यान, काही महिन्यात विद्यापीठात घडलेल्या घडामोडी यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बराच लांबला आहे. दीक्षांत समारंभाशिवाय विद्यापीठाची पदवी अधिकृत होत नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून डिसेंबर महिन्यात दीक्षांतचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. दरम्यान, १६ तारखेच्या परीक्षा पुढे ढकलल्यावर आता विद्यापीठाने नव्या तारखा जाहीर करीत २६ तारखेला पुढे ढकलण्यात आलेल्या विषयांच्या पेपरचे आयोजन केले आहे. त्यानुसार विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे.