अर्जुनी मोरगाव –=तालुक्यातील सुरबन बोंडगाव येथे गुरुवारी १२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास धान मळणीसाठी शेतात तयार करून ठेवलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील पुंजण्याला अचानक आग लागल्याने धानाचा पूजना जळून खाक झाला. या घटनेत दीड एकरातील ८५० भाऱ्यांचे पूंजने जळाले असून शेतकऱ्यांचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.
केशोरी पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सूरबन येथील शेतकरी विजय तितरे व भारत तितरे यांच्या गट क्रमांक २६८ मधील ०.५९ आर सामूहिक शेतातील गावालगत व घराशेजारी असलेल्या दीड एकर शेतात अ दर्जाच्या बारीक जय श्रीराम धानाची लागवड केली होती.अखेरच्या टप्प्यात संकलित करून मळणी करण्यासाठी शेतातच पुंजणा तयार करण्यात आला होता. येत्या एक-दोन दिवसात ते मळणी करणार होते. परंतु गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास सदर शेतकऱ्यांच्या धानपुंजण्याला आग लागली संपूर्ण दीड एकरातील ८५० भारे,पुंजणे जळून खाक झाले यात त्यांचे एक लाख रुपये नुकसान झाले.पुंजण्याला कोणी आग लावली याची माहिती अद्याप पर्यंत मिळू शकले नाही मात्र या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रात्री १२ वाजेच्या दरम्यान आग लागली ती सकाळी पहाटे चारच्या दरम्यान निदर्शनास आली शेतात जाऊन बघितलं असता आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे संपूर्ण धानाचा पुंजना जळून खाक झाला याबाबतची माहिती स्थानिक तलाठी यांना देण्यात आली व नुकसानीचा पंचनामा करून शासनाने या शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.